पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडी बु” येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अॅन्ड आऊटरिच प्रोग्राम” अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे आदेशानुसार या शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा उद्देश वरिष्ठ नागरिक, महिला, बालकांचे अधिकार या कायदेविषयक दिल्या जाणाऱ्या सेवा हा होता. याप्रसंगी वरिष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कायदेविषयक सेवा सुविधा याबाबत मा. सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. गोपाळ पाटील यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी राजकुमार धस, ग्रामविस्तार अधिकारी श्री नंनोरे, सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील, न्यायालयीन कर्मचारी विधी सेवा समितीचे अमित दायमा, दिपक तायडे, ईश्वर पाटील तसेच विधी शाखेचे विद्यार्थी सौरभ विसपुते, प्रवीण माळी, कृषभ तावडे, कांचन पाटील, मुस्तुरब्बा शेख, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तसेच न्यायालयातील कर्मचारी, विधी शाखेचे विद्यार्थी, आदींनी परिश्रम घेतले.