बी. एन. चौधरी धरणगाव भूषण पुरस्काराने सन्मानित

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पी.आर.हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी यांना बहुआयामी कार्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते धरणगाव भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

त्यांची रविवारी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून हे संमेलन जामनेर येथे संपन्न होत आहे. प्रा. चौधरींच्या रुपाने धरणगावात बालकवींचा वारसा पुढे चालू असल्याचे गौरवोद्गार ना. पाटील यांनी काढले. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या संकल्पनेतून धरणगाव भुषण पुरस्काराची सुरवात करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

या प्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, कबचौउमवीचे सिनेट सदस्य डी. आर. पाटील, उद्योगपती जिवन सिंग बयस, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय वाघमारे. चंदन पाटील, गुलाब मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वप्रथम पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंती निमित्ताने प्रा. प्रदीप देसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण पाटील यांनी तर आभार चंदन पाटील यांनी मानले.

Protected Content