भडगाव, प्रतिनिधी | कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय वडजी ता.भडगाव येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
टी.आर.पाटील विद्यालय येथे मुख्याध्यापक डी. डी.पाटील, बी. वाय. पाटील, ई. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिनाचा उद्देश विशद केला. एम. एस. देसले यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीची शपथ दिली. जेष्ठ शिक्षक एस. जे. पाटील, आर. एम. पाटील, एन. ए. हिरे यांनी मतदार दिनाचे महत्व रांगोळी व चित्रकला स्पर्धेतून साकारण्यास मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी विजय कुमावत, गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.