मुख्यमंत्री ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार ; खा. राऊत

THAKRE

मुंबई, वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला येत्या ७ मार्च रोजी  जाणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याच प्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही राऊत यांनी दिली.  या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामलल्लाचे दर्शनासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जाणार का, असा प्रश्न राऊत यांना पत्रकारांनी विचारला. यावर खासदार राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला हाणला. ते म्हणाले की अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र हे भारतीय जनता पक्षाला दिसत नाही. त्यांना हवे तेच ते पाहतात, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर शरसंधान केले. भारतीय जनता पक्षाने ज्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते, त्या मेहबूबा मुफ्तींना आयोध्या दौऱ्याच्या वेळी सोबत नेणार का, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.

Protected Content