जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अतिथी हॉटेलच्या बाजूला रोडवरून एका तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी १२ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशिफ पिंजारी (वय-३०) रा. पोलीस मुख्यालय, जळगाव हे वकील असून वकिलीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ मे रोजी दुपारी २ वाजता आरिफ पिंजारी हे त्यांची दुचाकी (एमएच 39एल १४१९) ने जळगाव शहरातील अतिथी हॉटेलच्या बाजूला असलेल्या रोडवर आले होते. त्या ठिकाणी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती व कामानिमित्त निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किंमतीची त्यांची दुचाकी चोरून नेली. दुपारी ३ वाजता आरिफ पिंजारी हे दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आले नाही. त्या परिसरात त्यांनी दुसरी सर्वत्र शोध घेतला, कुठलीही माहिती न मिळाल्याने अखेर रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापूराव बडगुजर करीत आहे.