कारण नसतांना महिलेला मारहाण करत विनयभंग

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात ४२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार ११ मे रोजी रात्री ८ वाजता महिला घरी असतांना गावात राहणारे शिवाजी नारायण सोनवणे आणि विनोद भास्कर सोनवणे हे शिवीगाळ करत होते. याचा जाब विचारला असता दोघांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी  शिवाजी नारायण सोनवणे आणि विनोद भास्कर सोनवणे यांच्या विरोधात शुक्रवार १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील करीत आहे.

Protected Content