जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना २०१७ पासून कल्याणकारी मंडळाचे थकीत लाभ मिळत नसून ते त्वरित मिळावेत व इतर मागण्यासाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयावर निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.

 

सीटूचे जिल्हा सचिव विजय पवार यांनी सांगितले की, अ१८ ऑक्टोबर २०२१ रेाजी जळगाव येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत कामागारांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली होती. परंतू याची दखल न घेतल्याने आज सीटू आणि जळगाव जिल्हा बांधकाम कामागर संघटनेच्या वतीने शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  २३ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आला. यात बांधकाम कामगारांच्या नोंदण्या, नूतनीकरण, कल्याणकारी मंडळाचे लाभ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात करायचे आहेत. मात्र, येथे कामगारांची कामे केली जात नाहीत. पैसे घेवून बोगस कामगारांची नोंदणी केली जात आहे. यात बांधकामाच्या कोणत्याही कामाशी संबधित नसलेल्या रिक्षावाले यांची नोंदणी केली जात आहे. शासनाच्या कल्याणकारी मंडळामध्ये एक टक्का उप करातून जो सेस जमा झाला आहे, याचा लाभ खऱ्या कामगारांना न मिलता बोगस कामगारांना मिळत आहे. बांधकाम कामगारांचे मागील २ वर्षांपासून विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यात शिष्यवृत्ती, दवाखाना, प्रसूती, लग्न , मुलांचे शाळांचे प्रकरणे, औजार खरेदी अनुदान, प्रशिक्षणासाठी असलेले ४२०० रुपये अनुदान व कोविड अनुदान मिळालेले नाही. कामगारांच्या मागणीवरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भांडे वाटप रद्द करण्यात आली. मात्र, त्याच्या अनुदानाची रक्कम अद्यापही कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही. कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्याकडे पैसे नसल्याने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांनी दिवाळीच्या आठ दिवसाआधी ही रक्कम नोंदीत कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले.

 

या निवेदनावर अनिल सपकाळे, जाकीर शेख, शिवदास सोनवणे, प्रविण चौधरी, नवल सोनवणे, महेश कुमावत, दिलीप सांगळे, रमेश मिस्त्री, कुतूबोद्दिन मिस्त्री, हनीफ मुशीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content