Home क्राईम अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्याला पुण्यातून अटक

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्याला पुण्यातून अटक

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार व मारहाण करणाऱ्या रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पुण्यातून अटक केली होती. शनिवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता त्याला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असतांना न्यायालयाने २५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

गोपाळ रामचंद्र माली (वय २८, रा. शांतिनारायण नगर, रामेश्वर कॉलनी परिसर, जळगाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याने पाचोरा तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका गावातून पळवून नेले. २९ जून ते २० जुलै पावेतो संशयित गोपाळ माळी याने पिडीत मुलीवर तिच्या घरी आणि पुण्यातील वाघोली येथे अत्याचार केले आहे. तसेच दारू पिऊन देखील तिला मारहाण केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

 

त्यानुसार पिंपळगाव पोलीस स्टेशनला तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गोपाळ माळी याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात न्यायमुर्ती शरद पवार यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारतर्फे ऍड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.


Protected Content

Play sound