जळगाव, प्रतिनिधी । जनता शिक्षण मंडळ खिरोदा येथील हुतात्मा चौकात माजी विधानसभाध्यक्ष गांधीवादी विचारवंत लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या समाधीवर त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या बुधवार दि. ८ जुलै रोजी आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे .
लोकसेवक बाळासाहेब चौधरीं यांच्या खिरोदा येथील समाधीवर त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे पूत्र व आमदार शिरीषदादा चौधरी हे आणि जनता शिक्षण मंडळाचे पदाधिकारी , विविध शाखेचे प्रमुख तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून आदरांजली अर्पण करणार असल्याचे कळविण्यात आले आहे.