डॉक्टर नसल्याने हिंगोण्याच्या महिलेला बाळंतपणासाठी गाठावे लागले जळगाव

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला चार तास वाट पहावी लागली मात्र, वेळीच वैदकीय सेवा न मिळाल्याने ग्रामस्थांनी या महिलेस जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले.

हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन वर्षांपासून  डॉ. फिरोज तडवी हे वैद्यकीय अधिकारी म्हणून धुरा सांभाळत होते. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध आदीवासी पाडे व गाव येतात.  डॉ. तडवी हे मागील काही महिन्यापासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्या गैरहजेरीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणा ढेपाळली असल्याचा प्रत्यय आज ग्रामस्थांना आला आहे. या केंद्रात जबाबदार अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यातच आज एक गरीब आदिवासी महिलेस प्रसवकळा जाणवू लागल्याने ती प्राथमिक आरोग्य केंद्रात आली असता तेथे कोणीही जबाबदार अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. याबाबत गावात चर्चा झाल्यावर ग्रामस्थांनी सामाजिक जाणीव दाखवत विविध वैदकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून परीस्थितीबाबत अवगत केले. मात्र, सर्वानीच उडवाउडवीचे उत्तरे दिलीत. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधलात असता त्यांनी देखील डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी देखील बघतो करतोच्या पलीकडे काहीच उत्तर दिले नसल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिले.मात्र, सक्षम वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेस जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले. 

 

Protected Content