भुसावळात कडकडीत बंद : रस्त्यांवर शुकशुकाट; कडेकोट पोलीस बंदोबस्त ( व्हिडीओ)

भुसावळ संतोष शेलोडे । येथे आज सकाळपासून सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन सुरू झाला असून नागरिकांची याचे पालन करावे म्हणून अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊनचे सक्त पालन केले जात असल्याचे दिसून आले आहे. पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये जळगाव व अमळनेरसह भुसावळ येथे आजपासून सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे. याचे पालन करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही पोलीस स्थानकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच राखीव दलाच्या तुकडीच्या मदतीने शहरात आज सकाळी सहा वाजेपासून बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शहरातील बहुतांश प्रमुख चौकांमध्ये आज सकाळपासूनच पोलीस उभे असून ते प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. यात कुणीही निरर्थक फिरत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुपारपर्यंत या प्रकारे अनेक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती देतांना बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत म्हणाले की, आज सकाळपासून अपर पोलस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावला असून शहरवासियांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. पुढील दिवसांमध्येही असाच प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

खालील व्हिडीओत पहा लॉकडाऊनबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/216798636114151

Protected Content