कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार गुन्ह्यात फादर स्टॅन स्वामी यांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।    २०१८ साली कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचार गुन्ह्याच्या राष्ट्रीय तपास संस्थेनं ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमधून अटक केली फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. २० मिनिटे चौकशीनंतर स्वामी यांना अटक केली.

शुक्रवारी स्वामी यांना एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. स्वामी यांना रिमांडवर घेतलं जाऊ शकतं किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणलं जाऊ शकतं. स्वामींच्या अटकेची माहिती एनआयएकडून झारखंड पोलिसांनाही देण्यात आलेली नव्हती. स्वामींची या अगोदर २७-३० जुलै आणि ६ ऑगस्टलाही चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चौकशीनंतर सगळे आरोप स्वामी यांनी फेटाळले होते.

 

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार उफाळला होता. मूळचे केरळ असणारे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले फादर स्टॅन स्वामी पाच दशकांपासून झारखंडमध्ये आदिवासींसोबत काम करत आहेत. त्यामुळेच स्वामींच्या अटकेचा निषेधही करण्यात येतोय.

‘फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलंय. मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या माग आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे’ असं इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटलंय.

Protected Content