आनंदवार्ता : रशियाच्या लसीला भारतात वापरासाठी मान्यता

 

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात कोरोनाचा संसर्ग वाढील लागला असतांना आता रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसीला भारतात वापरासाठी परवानगी मिळाली असून यामुळे लसीकरणाला वेग मिळणार आहे.

 

भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे.  औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे.  नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे.

 

डॉ. रेड्डीजने स्पुतनिक-5 लस भारतामध्ये आणण्यासाठी ‘रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’ यांच्यासोबत करार केला आहे.  भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे.

Protected Content