लॉक डाऊन वाढविल्याने कोरोना संपणार का ? : राज ठाकरे यांचा प्रश्न

 

मुंबई, वृत्तसेवा । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद आहेत हा लॉक डाऊन किती काळ वाढविणार असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन-३ ची मुदत संपत आहे. मात्र पुन्हा लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र लॉकडाऊन वाढवून प्रश्न सुटणार आहेत का? लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढवणार? त्यामुळे कोरोना संपणार आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सरकारच्या नियोजनातही काही त्रुटी असल्याचे मत त्यांनी मांडले. लॉकडाऊन किती वेळ सुरु ठेवणार यालाही काही मर्यादा असायला हव्यात. अजून किती दिवस लॉकडाऊनमध्ये घालवणार. सर्व गोष्टी बंद ठेऊन देशाचं आणि राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. योग्य खबरदारी आणि काळजी घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. कोरोना कधी संपेल यावर लॉकडाऊन अवलंबून नसावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Protected Content