लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करा ; मनसेची मागणी

रावेर, प्रतिनिधी । घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वत्र उद्योग व्यवसाय बंद आहेत. लोकांचा रोजगार बुडाला आहे. हाताला काम नाही आणि पोटासाठी दाणा नाही अशा विपन्नवस्थेत इथला गरीब कष्टकरी कामगार दिवस काढत आहे. लहान मोठे उद्योगधंदे व्यापार शेतीची कामे आदीवर झाला आहे. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे हातावर पोट असणारऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यापुढे मागील महिन्याचे वीज बिल आकारले तर ग्राहकांवरील आर्थिक ताण वाढणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घरगुती वीज बिल ग्राहकांचे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी केली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातीला स्थिर आकार पुढील तीन महिने स्थगित ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात हातावर पोट असलेला कामगारवर्ग देखील मोठ्या संख्येने आहे. कोरोनामुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याच धर्तीवर गरीब कामगारांचे वीज बिल रद्द करण्यात यावे असे राजपूत यांनी म्हटले आहे.

Protected Content