लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या खासगी बसला आरटीओने घेतले ताब्यात

जळगाव प्रतिनिधी। कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. जरी बर्‍याच प्रमाणात शिथिलता दिली असली तरी रेल्वे , एस .टी.महामंडळच्या बसेस आणि खासगी ट्रॅव्हल्स यांना परवानगी नसतांना भुसावळहून सुरतकडे जाणार्‍या गुजरातच्या ट्रॅव्हलला आरटीओच्या पथकाने अग्रवाल हॉस्पिटलजवळ पकडून कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , ट्रॅव्हल्सला अद्यापपावेतो शासनाने परवानगी दिलेली नसताना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओ विभागाने पाठलाग करत गुजरात पासिंग असलेली सुपर फास्ट लिहिलेली लाल रंगाची खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक जी.जे ०३ – डब्लू ९८४२ ताब्यात घेतली. संबंधीत ट्रॅव्हल ही भुसावळहून प्रवासी घेऊन सुरतकडे जात असताना शासकीय तंत्र निकेतनजवळ असलेल्या अग्रवाल हॉस्पिटलजवळ थांबविण्यात आली. यात आरटीओ अधिकार्‍यांनी सर्व चौकशी केली आणि थेट कार्यालयाच्या प्रांगणात ही बस जप्त करण्यात आली असून चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. परवानगी नसताना खासगी ट्रॅव्हल सुरू होती.या बसमध्ये १५ ते १६ प्रवासी होते. अजून कुठल्या खासगी ट्रॅव्हल सुरू आहेत का ? रात्रीच्या वेळेत जातात का ? याची चौकशी करण्यात येत आहे.

Protected Content