मनपा कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्णांची कोरोनमुक्तीनंतर सुट्टी

 

जळगाव,प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या १५ जणांना कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी सुट्टी देण्यात आली. सर्वांना पुढील निरोगी आरोग्याचा मूलमंत्र देत महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जळगाव शहरातील १५ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सोमवार दि.१५ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी कोरोनामुक्त झालेल्यांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, दिलीप तिवारी, डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.सायली पवार, डॉ.पल्लवी नारखेडे, डॉ.सोनल कुलकर्णी, डॉ.पल्लवी पाटील, डॉ.हेमलता नेवे, डॉ.पंकज नेवे, डॉ.करुणा भालेराव आदी उपस्थित होते.

रुग्णांनी महापौरांचे मानले आभार
कोरोना बाधित असलेल्या रुग्णांशी दररोज संपर्क करून महापौर सौ.भारती सोनवणे या माहिती जाणून घेत होत्या. रुग्णांना काही असुविधा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. कुटुंबाप्रमाणे काळजी घेतल्याने सर्व रुग्णांनी महापौरांचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्यांना टाळ्या वाजवून घरी पाठविण्यात आले. तसेच पुढील काही दिवस खबरदारी घेण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन देखील महापौरांनी केले.

Protected Content