जळगाव जिल्ह्यात आज १६८ रूण कोरोना पॉझिटीव्‍ह ; यावल, जळगाव, एरंडोलमध्ये संसर्ग वाढला


जळगाव प्रतिनिधी ।
आज सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात १६८ रूग्ण कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात यावल, जळगाव, एरंडोल तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.

 

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात आज १६८ रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रूग्ण संख्या ३१ ही यावल तालुक्यातील असून त्यांच्या खालोखाल जळगाव शहर २, एरंडोल १९ आणि रावेर, अमळनेर प्रत्येकी १६ रुग्ण आढळून आले आहेत.

 

उर्वरित तालुक्यातील आजची आकडेवारी याप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण ८, पाचोरा ५, भडगाव १, धरणगाव १०, जामनेर ४, पारोळा २, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर ८, भुसावळ ३, चोपडा ९, बोदवड ९ असे रूग्ण आढळून आलेत.

 

आत्तापर्यंत तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण

जळगाव शहर ७९६, जळगाव ग्रामीण १३३, भुसावळ ४३५, अमळनेर ३४२, चोपडा २६३, पाचोरा ९७, भडगाव २३४, धरणगाव १७७, यावल २२८, एरंडोल १७७, जामनेर २०६, रावेर २८४, पारोळा २३०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ४८, बोदवड ८८, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले रूग्ण १०, जळगाव जिल्ह्यातील इतर जिल्ह्यामधील रूग्ण ९० असे एकुण ३ हजार ७९८ रूग्ण आढळले आहे.

 

एकुण आलेख

आढळून आलेल्या रूग्णांपैकी आज सायंकाळपर्यंत १३९ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकुण २,२७० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर एकुण २५७ जणांना मृत्यू तर १ हजार २८२ रूग्ण उपचार घेत आहे.

Protected Content