फातेमा नगरात वारंवार लागतेय डीपीला आग (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फातेमा नगरात असलेल्या विद्यूत रोहित्रा (डी.पी.)ने अचानक पेट घेतला आहे. ही घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. रात्रभर या परिसरात विद्यूत पुरवठा बंद होता. दरम्यान महावितरण कंपनीला फोन करूनही सोमवारी १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकही कर्मचारी आले नसल्याचा संताप फातिमा नगरातील नागरीकांनी केली आहे. 

शहरातील फातेमा नगरात तीन वर्षापुर्वी येथे नवीन डी.पी. बसविण्यात आली होती. त्यावेळी लोकांची वस्ती कमी होती. आता एका डी.पी.वर  ५०० जणांचे विज कनेक्शन जोडण्यात आले आहे. विद्यूत प्रवाहाचा लोड पडत असल्यामुळे वारंवार रोहित्र जळत असल्याचे येथील नागरीकांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन वर्षात चार वेळा नवीन रोहित्र जळाले आहे. याबाबत महावितरण कंपनीला सांगून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजता यावर अधिक लोड पडल्याने रोहित्राने पेट घेतला होता आणि विज प्रवाह खंडीत झाला होता. आज सोमवार १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत डी.पी. जळतच होती. रोहित्राला आग लागल्यानंतर महावितरण कंपनीला कळविण्यात आले होते. फातेमा नगरातील रहिवाश्यांना रात्र अंधारात काढावी लागली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरू होते. वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी मुश्ताक पटेल, डॉ मोहसीन कुरेशी, शोदाब सलीम पटेल आणि आशीफ एम.आर. यांनी केली आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/463614168392526

Protected Content