कोरोना बाधीत व बरे होणार्‍यांचे जवळपास समसमान प्रमाण; अमळनेरात वाढला संसर्ग

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज बाधितांचा आकडा बाराशेच्या वर पोहचला असला तरी ११९५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची बाबही दिलासा देणारी ठरली आहे. तर जळगाव, भुसावळ व चोपड्यासह आता अमळनेरातही संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आत होती. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा बाराशेच्या पार अर्थात १२०१ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये ११९५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीत आणि बरे होणार्‍यांचे प्रमाण जवळपास समान असल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात १६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-२१३; जळगाव ग्रामीण-३३; भुसावळ-१२४; अमळनेर-२२०; चोपडा-१०४; पाचोरा-६९; भडगाव-१५; धरणगाव-३६; यावल-६६; एरंडोल-८४; जामनेर-३३; रावेर-१२२; पारोळा-९; चाळीसगाव-४; मुक्ताईनगर-५६; बोदवड-९ आणि इतर जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात आता अमळनेर आणि रावेर तालुक्यांमध्ये संसर्ग वाढल्याचे आता दिसून येत आहे. तर याच्या जोडीला पाचोरा, मुक्ताईनग, एरंडोल आणि यावल तालुक्यांमध्येही रूग्ण संख्या तुलनेत वाढलेली आहे. मात्र रूग्ण बरे देखील होत असल्याची बाब ही त्यातल्या त्यात दिलासादायक आहे.

Protected Content