यावल प्रतिनिधी : कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले असल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यासह तालुक्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान यावल तालुक्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ लाख ९७ हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढले होते. यात नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक जणांनी थांबु नये, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरवु नये, जिवनआवश्यक वस्तु खरेदी करतांना सोशला डिसटेंन्सचे काटेकोर पालन करावे. बाहेर फिरतांना तोंडाला मास्क / रुमाल बांधुन फिरावे असे सक्तीचे आदेश असतांना या नियमांचे पालन करण्याचे सुचना असुन देखील यावल तालुक्यातील महसुल प्रशासन, फैजपुर शहर नगरपरिषद, यावल नगर परिषदसह विविध ग्रामपंचायतीच्या, यावल व फैजपुर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन मागील पन्नास दिवसांपासुन लॉक डाऊनच्या काळात बेशिस्त नागरीकांकडुन दंडात्मक कारवाई करण्यात येवुन तहसील प्रशासन २९ हजार यावल पोलीस पन्नास हजार, फैजपुर पोलीस १३ हजार ५०० रुपये, सुमारे १ लाख २७ हजार ९०० रुपये , फैजपुर नगर परिषद ३३ हजार रुपये , ग्राम पंचायत स्तरावर ९ हजार रुपये अशा प्रकारे दंडाची वसुली केली असताना यावल नगर परिषदने मात्र ५० दिवसाच्या लॉकडाऊन काळात बेशिस्त नागरीकांकडुन दंडात्मक कारवाईचा कमालीचा निचांक काठला असुन फक्त ३००ते ४०० रुपये दंडापोटी म्हणुन वसुल केली आहे. नागरीकांनी लॉकडाऊनच्या काळात घरातच बसावे असे आवाहन यावल तालुका प्रशासनातर्फे केले आहे.