पाडळसा कासवा येथे युवकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे आणी कासवे येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आणि येथील युवा करियर अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने ५००० मीटर आणि १६०० मीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या. स्पर्धत मोठ्या संख्येत धावपटुनी आपला सहभाग नोंदविला.

या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी यांचे तर्फे या मॅरेथान स्पर्धत पहिल्या क्रमांकाचे विजेत्यास ५००० रु.बक्षीस आणि जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे तर्फे दुसरे क्रमांकाचे बक्षीस २५०० रु. इ.ठेवण्यात आले होते.

सकाळी नितीन चौधरी यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरुवात कासवा फाटा येथून करण्यात आली. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजयेत्यांना पारितोषिकसन्मानपत्र व मेडल वितरणाचा कार्यक्रम त्याच ठिकाणी पार पडला.

यावेळी विकास सपकाळे कासवा, गोपाळ सपकाळे, नितीन सपकाळे, धनु पाडळसे, नामदेव सपकाळे, आणि सुभाष सोनवणे ही मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्पर्धत सुमारे २oo ते ३०० तरुणांनी आपला सहभाग नोंदविला या मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक व जळगांव, जिल्ह्यातील तरुण धावपटूंनी सहभाग नोंदविला. संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा कॅरियर अॅकेडमीचे नितिन कोळी, संदीप कोळी, पंकज कोळी व आदीनी परिश्रम घेतले.

Protected Content