यावल शहरात ४२ तर ग्रामीण भागात १६० मंडळाकडून घटस्थापना

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात, नऊ दिवशीय घटस्थापना उत्साहात पार पडली आहे.

 

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गानंतर यंदा या वर्षात नवरात्रीचे उत्सव होत असल्याने सार्वजनिक मंडळामध्ये उत्साह संचारलेला आहे . यावल शहरासह, रावेर, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर या ठिकाणावरून देवीच्या आकर्षक मुर्त्या आणण्यात आले आहे.   या वर्षी ग्रामीण भागात १६० तर शहरात ४२ सार्वजनिक उत्सवासह दोन शालेय उत्सवाची स्थापना करण्यात आली आहे.

शहरात व परिसरातील ग्रामीण क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत मंडळाचे कार्यकर्त यांच्याकडुन दुर्गोत्सवाच्या स्थापनेचे काम सुरू होते. स्थापनेनिमित्ताने शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीने संपुर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधले .

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संसर्ग नंतर यावर्षी नवरात्री उत्सवात तरूण व युवा वर्गाचा उत्साह दांडगा आहे. सप्ताभरापासून नवरात्री उत्सवाची स्थापनेसाठी मंडप आरास रोषणाई यामध्ये युवा वर्ग दंग होता. आज सोमवारी नवदुर्गेची स्थापना उत्साहात करण्यात आली आहे. तर शाळांमधून तीन दिवसीय शार्दोत्सव साजरा करण्यात येत आहे. येथील बालसंस्कार विद्या मंदिर, शाळेची स्थापना मिरवणूक काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या विविध पथकांनी व रंगीबेरंगी बिरंगी पोषाकांनी शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले होते.

उत्सव उत्साहात व शांततेत साजरा करण्यासाठी येथील पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने शांतता समिती सदस्य व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.

 

Protected Content