लॉकडाऊनमध्ये वर्तमानपत्र वितरणावर बंदी

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन निर्देशांमध्ये प्रिंट मीडियाला सवलत देण्यात आली असली तरी मात्र २० एप्रिलनंतर घरोघरी वर्तमानपत्र वाटप करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता सर्व वर्तमानपत्रांना ई-आवृत्तीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

कोरोना अर्थात कोवीड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन २० एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना १७ एप्रिल २० रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.
त्यानुसार, राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, कोवीड १९ च्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे आता वर्तमानपत्रांचे वितरण थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी १० टक्के कर्मचार्‍यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content