अजित पवारांना प्राप्तीकर खात्याचा दणका : हजार कोटींची संपत्ती जप्त

मुंबई प्रतिनिधी | ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच प्राप्तीकर खात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाच मालमत्ता जप्त केल्या असून याचे मूल्य सुमारे एक हजार कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती. बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. यानंतर आता प्राप्तीकर खात्याने अजित पवार आणि त्यांच्या आप्तांशी संबंधीत मालमत्तांवर कारवाई केली आहे.

याच्या अंतर्गत -जरंडेश्वर साखर कारखाना अंदाजित किंमत ६०० कोटी; दक्षिण दिल्लीतील फ्लॅट -२० कोटी; पार्थ पवार निर्मल ऑफिस -२५ कोटी आणि निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट २५० कोटी या मालमत्तांचा समावेश असून या सर्व जप्त करण्यात आल्या आहेत.

अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाईला वेग येईल असा इशारा भाजप नेत्यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमिवर, अजित पवार यांना प्राप्तीकर खात्याने दणका दिल्याचे मानले जात आहे.

Protected Content