साकळी या गावाशी माझे वडिलोपार्जित जुने नाते, ते नाते कायम राहील – एजाज मलिक

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी गावाच्या भूमीशी माझे वडिलोपार्जित नाते आहे आणि ते नाते कायम राहील याची मी ग्वाही देतो. गाव विविध जाती-धर्मांच्या नागरिकांनी सजलेले आहे.त्यामुळे गावाची एकता व एकजूट अबाधित राहो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. एक चांगला देश- व समाज घडण्यासाठी आपल्या मुलांना शिकवा व सुजाण नागरिक बनवा.असे उद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस एज़ाज अ.गफ्फार मलिक यांनी काढले.

 

यावल तालुक्यातील साकळी येथील ग्रामपंचायत सदस्य सै.अश्पाक सै.शौकत व सामाजिक कार्यकर्ते फैसल खान सर तसेच मित्रपरिवार यांच्या वतीने शासकीय योजना अंतर्गत ई-श्रम कार्ड नोंदणीचे व शासकीय योजनांची माहिती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा अंतर्गत काढलेल्या ई- श्रम कार्डचे वाटप कार्यक्रम दि.३१ रोजी साकळी येथील पीकसंरक्षण सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस एज़ाज मलिक होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रा.पं.सदस्य सै.अहमद सै.मीरा, सै.तैय्यब सै.ताहेर,राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील, ग्रा.पं.सदस्य जगदीश मराठे, साकळी सर सय्यद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सत्तार खान, संचालक अ.कय्यूम शेठ, मेश ॲग्रो ड्रीप इरिगेशन(साकळी)चे संचालक युनूसभाई पिंजारी, प्रगतिशील शेतकरी मोहसिन खान, लतीफ मोमीन, के. बी. खान (साकळी), डॉ.साबिर खान, काँग्रेसचे वसीम खान अय्युब खान, वढोद्याचे सरपंच संदीप भैय्या सोनवणे, न्याजोयोद्दीनसेठ(साकळी), उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख नूर(प्लबंर) यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक व विविध संस्थांकडून प्रमुख अतिथी एज़ाज मलिक यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर लाभार्थी नागरिकांना ईं- श्रम कार्डचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात मलिक पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी माझ्यावर पक्षाच्या चिटणिस पदाची खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदारीचे भान ठेवत राष्ट्रवादीचे ध्येय-धोरणे व विचार घराघरात पोहोचवणे माझे आद्य कर्तव्य आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने व खंबिरआधाराने राज्य सरकार सुरळीतपणे राज्य चालवीत आहे. नेतृत्वाच्या उत्तुंग कर्तुत्वाने पवार साहेब आम्हा कार्यकर्त्यांसाठी चालते – बोलते विद्यापीठ आहे. तसेच ई-श्रम कार्ड वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल ग्रा.पं.सदस्य सै.अश्पाक सै.शौकत व सामाजिक कार्यकर्ते फैसल खान यांचे यांचे एज़ाज मलिक यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास गावातील युवकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम (सर)यांनी तर आभार प्रदर्शन इरफान (सर)यांनी केले.

Protected Content