यावल (प्रतिनिधी) येथील पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांची मंगळवारी रात्री अचानक तडकाफडकी बदली करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढले आहेत.
नव्या पोलीस निरीक्षकची नेमणुक होईपर्यंत यावल येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी कारभार सांभाळावा, असे आदेशात म्हटले आहे. पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी २७ जुलै रोजी यावल पोलीस स्थानकाचा पदभार सांभाळला होता. पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणुस हा पोलीस प्रशासनाच्या अधिक जवळ आला होता. त्यामुळे पोलीस आणी जनता ही यांच्यातील दिसुन येणारा दुरावा नाहीसा झाला होता. परंतु दुसरीकडे चोरी आणि विविध ठिकाणी घडलेल्या जातीय दंगली यामुळे श्री.परदेशी अडचणीत आले होते.