चांगदेव येथील प्रसाद लोखंडेचे आयटी परीक्षेत यश

मुक्ताईनगर प्रतिनिधी। तालुक्यातील चांगदेव येथील विद्यार्थ्याने इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट अँड रिसर्च जळगाव या मान्यताप्राप्त कोर्सेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर आयटी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट अँड रिसर्च जळगाव द्वारा आयोजित राष्ट्रीय स्तरावर  नॅशनल लेव्हल टेक्निकल सिंपॉसीएम फॉर स्टुडन्ट डिग्री प्राप्त केली आहे. यासह गोल्ड मेडल व दोन हजार रुपये रोख बक्षीस स्वरूपात मिळविले आहे .त्याच्या या  यशाने मित्र मंडळी , आप्तजन व स्वकीयांकडून त्याचे कौतुक होत आहे.
      चांगदेव येथील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेलं कुटुंब त्यात  वडील  यांना अर्धांगवायू चा आघात झाल्याने अपंगत्वाचे संकट आले  असताना  त्याची आई श्रीमती सुवर्णाताई यांनी कुटुंबाला सावरत स्वतः शेत मजुरी व मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकण्यास सुरुवात केली .हे करीत असताना मुलातील शिक्षणाची आवड जाणून घेत त्याला शिक्षणास प्रोत्साहन दिले . या  विद्यार्थ्याने देखील आईच्या कष्टाचे जाण ठेवत तिच्या कष्टाचे  चीज करून दाखवले आहे. आईच्या प्रचंड मेहनतीने  प्रसाद संजय लोखंडे या विद्यार्थ्याने देवगिरी कॉलेज औरंगाबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत. खान्देश कॉलेज कॉलेज एज्युकेशन सोसायटी द्वारा आयोजित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव कोर्सेस मध्ये आयटी टॉप केला आहे त्याच्या यशाने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे तर  हलाखीच्या परिस्थितीय  आईच्या कष्टाचे चीज करून दाखवत या विद्यार्थ्याने हे घवघवीत यश प्राप्त केल्याने  त्याच्या यशाने त्याच्या आई श्रीमती  सुवर्णाताई यांच्या  डोळ्यातील आनंदाश्रूतुन मुलाच्या यशाचा आनंद दिसून येत होता.

तसेच आईच्या कष्टाला यानेही स्वतः पार्ट टाइम जॉब करून साथ दिली आहे .व शिक्षणाच्या खर्चात आईच्या कष्टाचा भार हलका केला आहे हे विशेष . प्राध्यापक व गुरुजनांचा योग्य मार्गदर्शनात प्रसाद हा यशाची शिखरे गाठत आहे .यापूर्वीही त्याने  पंधरादिवसापूर्वी एम जी एम जवाहरलाल नेहरू कॉलेज अंतर्गत ई. यु फोरिया आय टी वेब डेव्हलपमेंट  परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातून तो प्रथम आला होता .

Protected Content