ग्रामसेविकेच्या बदलीसाठी सरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांचे बेमुदत उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येतील ग्रामसेविकेची बदली करण्यात यावी या मागणीसाठी तेथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

 

तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर या खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन मनमानी करत असल्याचा आरोप करत आज तेथील सरपंच नौशाद मुबारक तडवी यांनी आपल्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष बाब म्हणजे सरपंच या आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसही उपोषणाच्या ठिकाणी घेऊन आल्या आहेत.

त्यांच्या सोबतीला चुंचाळे ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी यावल पंचायत समिती समोर आज पासुन बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.

 

या उपोषणास जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील , महाराष्ट्र सरपंच परिषद या संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्यासह कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांनी आपला पाठींबा दिला आहे. या उपोषणास ठीकाणी गावातील ग्रामस्थ मंडळी देखील मोठ्या संख्येत उपस्थित आहे . मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण सुटणार नाही अशी भुमीका सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी घेतली आहे.

Protected Content