चक्कर येवून पडल्याने शेतमजूराचा अकस्मात मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल येथील एका तरूणाचा अचानक चक्कर येवुन पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी दिपक गंगाराम काळे (वय-३७) शेतमजुरी करणारा तरुण याला ४ नॉव्हेबर रोजी आपल्या घरात अचानक चक्कर येवुन तो जमीनीवर कोसळला त्यास तात्काळ उपचारासाठी प्रथम यावलच्या ग्रामीण रूग्णालयात व नंतर भुसावळ येथे उपचारासाठी दाखल केले. काळे यांच्या छाती दुखु लागल्याने श्वास घेण्यास त्रास होवु लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या संदर्भातील खबर वैद्यकीय अधिकारी डॉ शेख यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे . शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उर्दरर्निवाह करणारा कमाविता व्यक्तिचा अशा प्रकार मृत्यु झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Protected Content