महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या ड्युटीची वेळ होणार कमी !

मुंबई प्रतिनिधी | पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता राज्यातील महिला पोलिसांच्या ड्युटीच्या कामाचे तास १२ तासांवरून आठ तासांवर येणार आहेत.

 

येणार्‍या काळात महिला पोलीस कर्मचार्‍यांचे कामाचे तास १२ हून ८ तास करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचलक संजय पांडे यांनी यासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत. प्रारंभी प्रायोगिक तत्वावर ८ तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्याचे पांडे यांनी आदेश दिले आहेत. यानंतर काही दिवसात अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी देखील असते. यामुळे त्यांची बरीच दमछाक होते. यामुळे महिला कर्मचार्‍यांमध्ये आजारी पडण्याचं अन्य व्याधींनी ग्रास्त होण्याचं प्रमाण वाढतं. हे टाळण्यासाठी गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे त्याची ८ तास ड्युटी केल्यास महिला पोलीस कर्मचारी गैरहजर राहणे, आजारी पडणे हे प्रमाण कमी होईल, अशी धारणा यामागे आहे. मात्र सण उत्सव काळात महिला कर्मचार्‍यांच्या तासाबाबत वरिष्ठांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

Protected Content