जिल्हा परिषदेची उद्या सर्वसाधारण सभा गाजणार

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडीनंतर उद्या मंगळवारी ३ रोजी पहिलीच सर्वसाधारण सभा होत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक असल्याने सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना कसोटी लागणार आहे.

दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे. विविध विषयांवरून ही सभा गाजण्याची शक्यता असल्याने नवीन पदाधिकाऱ्यांसाठी दमछाक ठरणार आहे. दरम्यान आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. आढावा बैठकीला अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सभापती जयपाल बोदडे, रविंद्र पाटील, ज्योती पाटील, उज्ज्वला माळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

रोहयोजनेच्या आराखडा मंजुरीसाठी 
आजच्या सभेच्या अजेंड्यावर १० विषय आहेत. यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा या वर्षाचा कृती आराखडा व लेबर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ८० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवरील ९५ पदांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २०१८-१९ च्या वित्तीय वर्षात ३०/५४ आणि ५०/५४ च्या रस्त्यांसाठी मंजुरी निधी खर्चास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत विषय सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. जि.प.च्या उपकर निधीतील २० टक्के निधीतून समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक आणी सामुहिक योजनांच्या पुनर्विलोकनास मान्यता देण्यात येणार आहे.

Protected Content