किनगाव येथे इंग्लीश मेडीकल स्कुलचा  स्नेहसंमेलन उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दोनगाव किनगाव मार्गावरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल येथे सालाबादाप्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेहसंमेलन व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्येक्रमाचे उद्घाटन शैलेजाताई विजयकुमार पाटील यांनी केले तर इंग्लिश मेडीयम स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनिष विजयकुमार पाटील, माधवी मनिष पाटील, माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य संजय उधोजी, प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्ये अशोक पाटील व्यासपिठावर उपस्थीत होते.
यात इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टाँल थाटले होते यात चहा,कचोरी, पाव भाजी, इटली ढोसा, ताक, निंबू शरबत, मसाले पापड इ.सह विविध खाद्य पदार्थ उपलब्ध होते व पालकांनसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इंग्लिश मेडीयम स्कुलचे सचिव व व्हि.मार्टचे सर्वेसर्वा मनिष विजयकुमार पाटील व सौ.माधवी मनिष पाटील यांनी ही स्टालवर खाद्यपदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या भव्य प्रांगणात आयोजीत या आनंद मेळाव्याला मोठा प्रतिसाद मीळाला तर याच वेळी मनोरंजनासाठी मँजीक शो चेही आयोजन करण्यात आले होते यात जादुगर अविनाश दुसाने यांनी वेगवेगळे प्रयोग दाखवत उपस्थीतांचे मनोरजंन केले.

या आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गोपाल चित्ते, दिलीप संगले, जावेद तडवी, पूजा पाटील, प्रियंका लिंबायत, रोहिणी देशपांडे, मिलिंद भालेराव, दिनकर पाटील, राजश्री अहिरराव, नेहा धांडे, तुषार धांडे, प्रीती महाजन, हर्षल मोरे,आनंद तायडे, संपत बारेला, भारती साठे, देवयानी साळुंखे, अनिल बारेला, वैशाली धांडे, सुनील चौधरी, पवन महाजन, योगिता बिहारी, अनिता देशमुख, पूजा देशमुख, भावना चोपडे, देवश्री ठोके, प्रतिभा धनगर, बाळासाहेब पाटील, प्रमोद देसले यांनी परिश्रम घेतले.

Protected Content