भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत

BJP Shiv Sena alliance

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भाजपने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मित्रपक्षांना खूष करण्यासाठी त्यांना द्यावयाच्या काही जागांमध्ये ग्रामीण भागांबरोबरच मुंबईतील जागांचाही समावेश असल्याचे कळते.

 

भाजपने जिंकलेल्या १२२ आणि शिवसेनेने जिंकलेल्या ६३ जागा अशा १८५ जागा वगळून उरलेल्या जागांपैकी निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे शिवसेना १०० ते ११५ समाधान मानणारा नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत गेल्या विधानसभेसारखी युती तोडायचीच वेळ आली तर राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागा मित्रपक्षांसोबत लढण्याबाबतची तयारीही भाजपने पडद्यामागून सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केल्याचे कळते. मागच्या विधानसभेला ६ जागा लढविणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने यावेळी ५७ जागांची मागणी केली आहे. याशिवाय शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनीही मागच्यापेक्षा दुपटीने जागा मागितल्याचे कळते. विशेष म्हणजे या जागांबाबत भाजपच्या नेत्यांकडूनही चर्चा होत असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.

Protected Content