ला. ना. शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शेठ. ला.ना. सार्वजनिक विद्यालयातर्फे शालांत पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन गुरुवार दि. ८ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.

 

गुरुवार दि. ८  सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता शालांत पारितोषिक वितरण समारंभाचे  शाळेच्या भैयासाहेब गंधे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या  पारितोषिक वितरण कार्यक्रमात  इ.१० वी मधील शेकडा नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच  विविध विषयातील गुणवंतांचा सत्कार  गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी  तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुशील अत्रे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मार्च २० , मार्च २० व मार्च २२ मधील गुणवंत विद्यार्थी व पालकांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शाळेच्या भैयासाहेब गंधे सभागृहात आयोजित केला आहे याश्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे  व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी कामकाज पाहता आहेत.

Protected Content