लाल किल्ला हिंसाचार ; आणखी एक आरोपी पकडला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत

 

प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. एका गटाने लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता. या घटनेप्रकरणी अभिनेता यापूर्वी दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

 

महिंदर सिंग उर्फ मोनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मोनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हिंसाचाराच्या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. ३० वर्षीय मोनी दिल्लीतीलच स्वरूप नगर येथील रहिवासी असून, त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.

 

मोनीच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी दोन तलवारी सापडल्या. पोलिसांनी तलवारी जप्त केल्या असून, आरोपी महिंदर सिंगची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे

Protected Content