बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची एनएसयुआयची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे उगवले नसल्याची तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या असून बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एनएसयुआयच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले पिक उगवले नाही. जिल्ह्यात ४२ ठिकाणी उगवण नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस बियाण्यांची विक्री जिल्ह्यांमध्ये सर्रासपणे सुरू आहे व शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक असे दोन्ही प्रकार कृषी केंद्र चालकांकडून बोगस बियाणे विक्री करून सुरू आहे.

जिल्ह्याच्या कृषी विभागाचा शेतकऱ्यांकडे हेतुपुरस्कर कानाडोळा
हजारो शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्यानंतर देखील या बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापही झालेली नाही. जिल्ह्यातील मोठमोठे प्रस्थापित कृषी केंद्र मालकांशी जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहेत व त्यामुळेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवरती व कंपन्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही हे दिसून आले आहे.

Protected Content