पंतप्रधान मोदी अचानक पोहचले लेह सीमेवर

लेह (वृत्तसंस्था) भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्योदय होण्याआधीच आज अचानक लेहमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.

 

यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखचा दौरा करणार होते. परंतु, हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. यानंतर आता थेट पंतप्रधान मोदीच लेहमध्ये दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निमूमधील अग्रेषित ठिकाणी आहेत. मोदी पहाटे येथे तिथे पोहोचले. मोदी आज सैन्य, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मधील रुग्णालयात जाणार आहे. जखमी सैनिकांची करणार विचारपूरही करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथे लष्करी अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने जवान उपस्थित होते.दरम्यान 15 जूनला लद्दाख मध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षामध्ये कर्नल संतोष बाबू सह 20 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर मागील काही दिवसांपासून सीमाभागात तणाव आहे.

Protected Content