जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्राईम रिपोर्टर व लाचलुचपत विभागाची अधिकारी असल्याचे भासवून महिलेकडून ४५ हजाराची खंडणी घेवून तिला शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी विवाहिता ही जळगाव पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी म्हणून नोकरीला आहे. ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान महेंद्र सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही) रा. खर्दे ता. धरणगाव, राजेंद्र निकम (पुर्ण नाव माहित नाही) (कथित क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्यूज रिपोर्टर)रा. वाघ नगर जळगाव यांच्यासह एक अनोळखी असे तिघांनी विवाहितेला पंचायत समिती कार्यालयात येवून आपण लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अधिकारी असल्याची बतावणी करून कट रचून महिलेच्या हातात १ हजार रूपयांची रक्कम ठेवून व्हिडीओ बनविला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी व भिती दाखवून महिलेकडून ४५ हजाराची खंडणी वसूल केली. तसेच तिच्याशी अंगलट करून शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्या १५ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा महेंद्र सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही) रा. खर्दे ता. धरणगाव, राजेंद्र निकम (पुर्ण नाव माहित नाही) रा. वाघ नगर जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.