लासलगावच्या पिडीतेचा रुग्णालयात मृत्यू

Rape Burnt Case

नाशिक प्रतिनिधी । लासलगाव येथल्या जळीत कांडातील पीडित तरूणीचा आज पहाटे उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

गत शनिवारी ही जळीत घटना लासलगाव येथिल बसस्थानकात घडल्यानंतर नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना सदर महिलेची प्रकृती खालावली. त्यामुळे तीस मुंबई येथे मसीना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर उपचार सुरू असतांना आज पहाटे तिने अंतिम श्‍वास घेतला. तिच्या पार्थिवावर लासलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Protected Content