यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्थाच्या माजी चेअरमन यांच्यासह सहकार अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने करण्यात आलेल्या लाखो रुपयांचा मुद्रांक घोटाळा केल्याची तक्रार नितिन सोनार यांनी जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे. परंतू अद्यापपर्यंत संबधीतांपर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
यावल येथील नितिन श्रावण सोनार यांनी १५ मार्च रोजी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निंवेदनात म्हटले आहे की, यावल येथील श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन पंकज श्रावण सोनार यांनी सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून सहकार कायद्यातील तरदुतीनुसार आवश्क कोर्ट मुद्रांक फी व प्रोसेस फी रक्कमांमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याने तसेच मुहांकचा गैरवापर करून फसवणुक केल्याबाबत कायद्याशीर कार्यवाही करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. यासंदर्भातील प्राधीकृत चौकशी अधिकारी तथा अॅड. खेवलकर यांनी कलम ८८ अन्वये सहाय्यक निबंधक यावल यांनी सादर केलेला चौकशी अहवाल, त्याचप्रमाणे जिल्हा सरकारी वकीलांनी सहाय्यक निबंधक यावल यांना १६ जानेवारी २०१८ रोजीचे संबधीतांवर फसवणुक केल्या संदर्भात श्री कालिका सहकारी पंतसंस्था यावलचे माजी चेअरमन पंकज सोनार यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.