कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक असलेल्या कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी घडली आहे.

 

आरोग्य सेवक विठ्ठल बळीराम भिसे (वय-३८) यांचे मंगळवारी १४ रोजी दुपारी १२:३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. मुळचे जरोदा ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील रहिवाशी असलेले विठ्ठल भिसे हे किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नायगाव व किनगाव परीसरात सेवा बजावत होते. ते कार्यतत्पर व मन मिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या मुळगावी १५ रोजी सकाळी ९ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

दोन वर्षापुर्वी आलेल्या कोराना संकटाच्या काळात लसिकरणासाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राने केलेल्या उल्लेखनीय कार्यात वैद्यकीय आधीकारी डाँ. मनिषा महाजन यांना सर्व सहकारींनसह विठ्ठल भिसें चे ही मोलाचे सहकार्ये मिळाले होते. एकंदरीतच भिसे हे आपल्या उत्तम आरोग्य सेवेबाबत किनगाव, नायगाव, वाघझीरा, मालोद या परीसरातील नागरीकांशी परीचीत होते. विठ्ठल भिसे यांच्या निधनाने किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रासह परीसरात शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहीणी, पत्नी, ८ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी असा परीवार आहे.

Protected Content