नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रदान नरेंद्र मोदींनी समाजातील अनेकांशी विस्ताराने चर्चा केल्यानंतर या पॅकेजचे व्हिजन ठेवले होते आणि आमचे लक्ष्य आत्मनिर्भर भारतावर आहे. हे पॅकेज देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे. स्पेशल पॅकेजमधून लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एमएसएमईसाठी ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. हे कर्ज गॅरंटी फ्री लोन ४ वर्षांसाठी असेल, सविस्तर पद्धतीने या आर्थिक पॅजेकमधील तरतुदींची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज हे देशाचा आत्मनिर्भर करण्याचाच दृष्टीने असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी केंद्राकडून यापूर्वी देण्यात आलेल्या काही योजना आणि आर्थिक तरतुदींचा उल्लेखही केला. सरकारी बँका भ्रष्टाचारमुक्त करण्यापासून ते जनधन योजनेबाबतच त्यांनी यावेळी भाष्य केले. पॅकेजची घोषणा आत्मनिर्भर भारताच्या व्हिजनला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. याचे पाच स्तंभ इकोनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, डेमोग्राफी आणि डिमांड आहे. सीतारमण यावेळी पुढे म्हणाल्या की, आत्मनिर्भर भारताचा अर्थ म्हणजे हा नाही की, आम्ही विभक्त विचार ठेवत नाहीत. आमचा फोकस लोकल ब्रँडला ग्लोबल बनवण्याचा आहे.आत्मनिर्भर भारतासाठी अनेक पाउले उचलण्यात आले. शेतकरी, कामगार, मजुरांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यात आले. पीएम किसान योजना, उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत लोकांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले. या योजनांचा फायता शेतकऱ्यांना झाला. जीएसटीमुळे लघु उद्योगांना मध्यम उद्यागांचा फायदा झाला आहे.तसेच पंतप्रधानांच्या ‘स्वावलंबी भारता’च्या दृष्टीच्या निर्णयांबद्दल आम्ही पुढचे काही दिवस वेळोवेळी माहिती देत राहू. लॉकडाऊननंतर गरीब कल्याण योजनेची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये रेशन आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही त्यांनाही रेशन देण्यात आल्याचेही अर्थमंत्री म्हणाल्या.