जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अधिष्ठाता कार्यालयात लघुलिपी कलेचे जनक सर आयझॅक पिटमॅन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
प्रसंगी उच्चश्रेणी लघुलेखक व अधिष्ठाता यांचे स्वीय सहायक दिलीप मोराणकर यांनी सर आयझॅक पिटमॅन यांच्याविषयी माहिती सांगितली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अरुण कसोटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी जी.जी.दिघावकर, जे. एस. गवळी, शामकांत दुसाने, समीर देवसंत, एन. के.वाघ, दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, गणेश धनगर, गणेश घुगे, विशाल दळवी, रवींद्र मुळे, अनिल कापुरे, ज्ञानेश्वर डहाके, राजेंद्र वैद्य, ज्ञानेश्वर राठोड, किरण बावस्कर, गोपाल बहुरे, किशोर आव्हाड, उमेश टेकाळे, प्रदीप जयस्वाल, शितल राजपूत, विजया बागुल, देविदास गायकवाड, किरण पवार, एस.एन.थोरात, बी.सी.शिंदे, विजय जगताप, राकेश सोनार, चेतन निकम, संजय शेळके, विश्वजीत चौधरी, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, गणेश इखे, मोहन पाटील, विजय बागुल आदी उपस्थित होते.