पोलीस शहिद स्मृतिदिनानिमित्त स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस शहिद स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयातील आवारात स्मृतीस्तंभाला शहिद झालेल्या पोलीस व जवानांना जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पुष्पचक्र अर्पण करून लास्ट पोस्ट, राऊज धून वाजवून तसेच हवेत तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार, स्वातंत्र्य सैनिक, शहिद परिवार कुटुंबीय, प्रतिष्ठित नागरीक, शिक्षक, विद्यार्थी, निवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, योगेश गणगे यांनी गेल्या वर्षभरात देशात शहिद झालेले पोलीस, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानांच्या नावाचं वाचन केले. स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लास्ट पोस्ट, राऊज धून वाजवून तसेच हवेत तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली. परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, दिगंबर थोरात यांच्या नेतृत्वात शहिद स्मृती परेडच संचलन करण्यात आले.

कार्यक्रमाला पोलीस कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील, रावसाहेब गायकवाड, सतीश देसले, जयंत चौधरी, सुरेश राजपूत, प्रशिक्षक देविदास वाघ, सोपान पाटील, राजेश वाघ, रज्जाक सैय्यद, आशिष चौधरी, दीपक पाटील, हरिष कोळी, दिव्या मराठे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content