जिल्हा दूध संघाने केली दरात वाढ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जिल्हा दुध संघाच्या संचालक मंडळाच्या शुक्रवार  दि. २१ ऑक्टोबर रोजी  झालेल्या सभेत आजपासूनच दुध उत्पादकांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाच्या या निर्णयाने दुध उत्पादकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

आजचच्या सभेत संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आज शुक्रवार  दि. २१ ऑक्टोबरपासून दुध उत्पादकांसाठी गाय दूध खरेदी दरात मध्ये २ रुपये १० पैसे प्रती लिटर तसेच म्हैस दूध खरेदी दरातमध्ये १ रुपया ४० पैसे प्रतीलिटर वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता गाय दूध खरेदी दर ३६ रुपये प्रतिलिटर तर म्हैस दूध दर ८२० किलो फॅट किंवा ५७ रुपये ४० पैसे प्रति लिटर राहतील.

सर्व संचालक मंडळाच्यावतीने दूध संस्थेच्या चेअरमन व पंचकमेटी सदस्यांना वाढीव दूध दराचा फायदा जास्तीत जास्त दूध उत्पादकांना देवून संस्थेच्या दूध संकलनात वाढ करुन जास्तीत जास्त उत्तम गुणवत्ता प्रतीच्या दुधाचा पुरवठा दूध संघास करावा, असे आवाहन चेअरमन मंदाकिनी एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

Protected Content