सोशल मीडियात अफवा पसरवू नका- पोलीस अधिक्षकांचे आवाहन

panjabrao ugale

panjabrao ugale

जळगाव प्रतिनिधी । अयोध्येतील वादाप्र्रकरणी निकालाबाबत नागरिकांनी सोशल मीडियात अफवा पसरवू नये असे आवाहन करतांना हा प्रकार झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी दिला आहे.

शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील वादग्रस्त जागे प्रकरणी सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करणारी पोस्ट समाजमाध्यमातून शेअर केली आहे. यात म्हटले आहे की, श्रीरामजन्मभूमि – बाबरी मशिद म च्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असून तीचेवर सर्व भारतीय जनतेचा विश्‍वास आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. या प्रकरणाचा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, ट्विटर आदींवर दिल्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच सोशल मीडिया,पत्रकांचे माध्यमातून टीकाटिपणी देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणार्‍या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे असे निर्देशदेखील डॉ. उगले यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की-
१) जमाव करून थांबू नये.
२) सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
३) निकालानंतर गुलाल उधळू नये.
४) फटाके वाजवू नयेत.
५) सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
६) महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
७) निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत.
८) घोषणाबाजी जल्लोष करू नये.
९) मिरवणुका रॅली काढू नये.
१०) भाषण बाजी करू नये.
११) कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
१२) कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.

संबंधीत निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल.तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्या व्यक्तीवर खालील कलमान्वये कारवाई करण्यात येईल.
* कलम २९५ कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.
* कलम २९५ (अ) कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.
* कलम २९८ धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे.
याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित निकालाच्या सुनावणी बाबत सोशल मिडीयावर अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍यावर जळगाव जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल लक्ष ठेवून आहे. जळगाव जिल्यातील समाजकंटक , उपद्रवी व कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या इसमाची यादी जळगाव जिल्हा पोलीस दलाने तयार केलेली असून त्यांचे वर गोपनीय पध्दतीने निगराणी ठेवलेली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येथे की , जो कोणी असे आक्षेपार्ह मजकुर , फोटो वा व्हीडीओ क्लीप प्रसारीत करेल , लाईक करेल , शेयर करेल , किंवा कॉमेंट करेल तो भारतीय दंड संहिता ( आयपीसी ) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ( आयटी अ‍ॅक्ट ) कायद्या प्रमाणे दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहील .
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुर , फोटो, व्हीडीओ क्लीप आल्यास तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशन / पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव – ०२५७ – २२२३३३३, ०२५७ -२२३ ५२३२ , व्हाटसअ‍ॅप क्रमांक ९४२२२ १०७०१ / सायबर पोलीस स्टेशन जळगाव – ०२५७ – २२२९६९५ व्हाटसअ‍ॅप क्रमांक ९४२२२ १०७०२ ) यांना कळवावी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.

Protected Content