कॉम्प्यूटर व्यावसायिकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शाहूनगर परिसरातून एका कम्प्युटर व्यवसायिकाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत मंगळवारी १८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक मल्हारी टेकावडे (वय-४६, रा. हनुमान मंदिराजवळ शाहूनगर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्यांच्या घराजवळ दुकान टाकून कम्प्युटर व झेरॉक्सचे व्यवसाय करत असतात. रविवार १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाच्या समोर झाडाखाली त्यांची दुचाकी (एमएच १९ डब्ल्यू ५९०) ही दुचाकी पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक टेकावडे यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी न मिळाल्याने अखेर मंगळवारी १८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

Protected Content