जळके उपसरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी ग्रामविकास पॅनलच्या वत्सलाबाई कडुबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गणपत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीत झाली.

शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती प्रणित ग्रामविकास पॅनलने जळके ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी चंद्रकांत गणपत पाटील हे बहुमताने निवडून आले आहेत. तर उपसरपंचपदी वत्सला कडुबा पाटील यांची एका बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक मनोज तायडे यांनी बघितले. वत्सलाबाई पाटील यांनी या अगोदर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य पद भूषवले आहे. त्यांची उपसरपंचपदी निवड होताच त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुशिलाबाई रमेश पाटील, रुखमाबाई बाबूलाल पाटील, सुमनबाई वामन मोरे, शिल्पा दादा ब्राम्हणे, निवृत्ती अर्जुन पाटील,दिगंबर प्रल्हाद पाटील, संजय गांधी निराधार समितीचे जळगाव तालुका माजी अध्यक्ष रमेश पाटील, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज, जळकेकर, पी.के.पाटील,धनराज पाटील, नाना पाटील, संजय पाटील, अशोक जाधव, कविश्वर पाटील, नामदेव पाटील, मोहन पाटील, बापू पाटील, कांताबाई भागवत पाटील, चंद्रकला अशोक पाटील, वंदना चंद्रकांत पाटील, गुलाब पाटील, संदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content