लग्नाला नकार ; तरुणीची भरबाजारात हत्या !

गाझियाबाद (वृत्तसंस्था) लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरू तरुणाने भरबाजारात तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. नैना बलदेव सिंह (वय १९) असे मयत तरुणीचे नाव आहे.

 

 

नैना दिल्लीत नर्सिंगचा कोर्स करत होती. आरोपी शेरखान (वय २२) हा आरोपी आणि त्याचे दोन साथीदार काही दिवसांपूर्वी तिच्या घरी गेले होते. आठवडाभरापूर्वीच त्याने घरी येऊन लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र, नकार दिल्याने त्याने धमकावले होते, अशी माहिती नैनाच्या आईने दिली आहे. बुधवारी रात्री ती आपल्या आईवडिलांसोबत एका मोबाइल दुकानात गेली होती. त्याचवेळी एका चेहरा झाकलेल्या तरुणाने नैनाला धक्का मारला आणि तिला खाली पाडले. त्यानंतर तिच्यावर चाकूने सपासप वार केले. दरम्यान, आरोपी नैनावर चाकूने वार करत असताना पाहून तिच्या आईवडिलांनी मारेकऱ्याला जोरदार प्रतिकार केला. मारेकऱ्याने नैनाच्या आईवरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न घाबरता तिच्या आईने त्याला विरोध केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

Protected Content